खेकडा - कांदा भजी | HOW TO MAKE KANDA BHAJI


खेकडा - कांदा भजी




साहित्य:

• २ मध्यम कांदे

• १/४ टिस्पून हिंग

• १/२ टिस्पून हळद

• २ टिस्पून लाल तिखट

• १/२ टिस्पून जिरे

• १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून

• बेसन साधारण १/४ ते १/२ कप

• १ टेस्पून तांदूळ पिठ

• चवीपुरते मिठ

• ५ ते ६ कढीपत्ता पाने (ऐच्छिक)

१• १/४ टिस्पून किसलेले आले (ऐच्छिक)

१• तळण्यासाठी तेल


कृती:

• कांद्याचे पातळ उभे स्लाईस करावेत. त्यात हळद, लाल तिखट, हिंग आणि मिठ मिक्स करावे आणि १/२ तास झाकून ठेवून द्यावे. यामुळे कांद्याला थोडे पाणी सुटेल.

• कांद्याला पाणी सुटले कि त्यात १ चमचा तांदूळ पिठ घालावे आणि साधारण ४ ते ५ टेस्पून बेसन घालावे. व्यवस्थित मिक्स करावे. यामध्ये अधिकचे पाणी अजिबात घालू नये, कांद्याला सुटलेल्या पाण्यातच पिठ घट्टसर भिजवावे. तसेच खुप जास्त बेसनसुद्धा घालू नये, थोडा कांदा दिसला तरी चालेल.

• नंतर यात कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता चिरून, आले घालून मिक्स करावे. एकदा चव पाहून गरजेनुसार जिन्नस घालावेत.

• तेल गरम करून त्यात भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे भाग मोकळे मोकळे करून तेलात सोडावेत. भजी खमंग तळून घ्यावीत आणि गरम गरम सर्व्ह करावी.


Comments