साबुदाणा खिचडी | How to Make Sabudana Khichadi
साबुदाणा खिचडी
• दिड कप साबुदाणा
• १/२ कप बटाट्याचे काप
• १/२ कप शेंगदाण्याचा कूट
• ४-५ हिरव्या मिरच्या
• २ टेस्पून साजूक तूप
• १/२ टिस्पून जिरे
• चवीपुरते साखर, मीठ
• कोथिंबीर
• १ लिंबू
कृती:
- साबुदाणे पाण्यात भिजवावे...उरलेले पाणी काढून टाकावे. ४-५ तास भिजत ठेवावेत.
- कढईत २ चमचे तूप गरम करावे. त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याचे काप घालून परताव्यात. वाफ काढावी.
- बटाटा निट शिजला गेला कि त्यात साबुदाणे घालावेत. वाफ काढावी.साबुदाणा शिजला कि शेंगदाण्याचा कूट घालावा.
- मिक्स करून नारळ, लिंबाचा रस, चवीनुसार साखर मिठ व कोथिंबीर घालावी आणि दह्याबरोबर खावे.
- खिचडीबरोबर लिंबाचे गोड लोणचेही खुप छान लागते.
बंगळुरात असाल तर ते दहा-बारा तास तरी भिजत ठेवावेत! :-)
ReplyDeleteYummy
ReplyDelete