शेवई खीर | HOW TO MAKE SHEVAI KHEER
शेवई खीर
• १/२ कप बारीक शेवई
• १/२ लिटर दूध
• १/४ कप साखर
• ४-५ काजु
• ४ बदाम
• १/४ चमचा वेलदोडा पावडर
• ४-५ केशर काड्या
• ३ चमचे दुधात भिजवून
• ४ चमचे चांगले तूप
कृती:
- एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आटवायला ठेवून द्या.
- एका मोठ्या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून काजू लालसर तळून घ्या.
- काजू काढून त्याच कढईमधे एक चमचा तूप टाकून शेवया गुलाबीसर भाजून घ्या. (अगदी बारीक आचेवर कढई ठेवा नाहीतर शेवया लगेच करपून जातात.)
- दूध थोडे आटले की भाजलेल्या शेवयांमध्ये दूध टाकून ढवळून घ्या. त्यात साखर, वेलदोडा पूड, बदाम टाकून ५-७ मिनिटे शेवया शिजेपर्यंत उकळू द्या.
- शेवटी गॅस बंद करून खीर काढून घ्या वरून तळलेले काजू आणि केशर आणि एक चमचा पातळ तूप टाका.
- खीर गार झाली कि दाट होते त्यामुळे वाढताना थोडे दूध टाकून सैल करा.
❤️❤️
ReplyDelete