ढाबा स्टाईल चमचमीत तवा चिकन | Spicy Dhaba Style Tawa Chicken
नमस्कार,
अक्षता रेसिपी मराठी मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत.
घरातलेच मसाले वापरून गरम मसाला बनवणार आहोत.
खूप छान असा flavour येतो. चव उतरते जबरदस्त.
गरम मसाला साठी लागणारे खडा मसाला:
२ चमचे धने
१ चमचा जिरे
१ दालचिनी
१ चक्री फूल
४-५ काळी मिरी
४-५ लवंग
३-४ सुक्या मिरच्या
हे खडे मसाले हलके भाजून घ्यायचे . करपावयचे नाही. फक्त भाजून घ्यायचे. हे जर करपले तर या मसाल्याचा कडवटपणा त्या पदार्थांमध्ये उतरतो आणि पदार्थाची चव बिघडते.
मसाले गरम झाले आहेत. ते मिक्सर च्या भांड्यात काढून घेऊया आणि याची बारीक पूड करून घेऊयात.
खडे मसाले ची बारीक पूड तयार झाली आहे...
आता आपण रेसिपी पाहुयात कशी साध्या पद्धतीने करायची ती...
खडे मसाले ची बारीक पूड तयार झाली आहे...
आता आपण रेसिपी पाहुयात कशी साध्या पद्धतीने करायची ती...
( प्रिय, मित्र आणि मैत्रिणींनो अक्षता रेसिपी आवडतात ना...मग चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन वरही क्लिक करा.)
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
कृती:
तव्यामध्ये ३-४ चमचे तेल गरम करत ठेवावे
तेल गरम झाले की त्यात १ मध्यम आकाराचा कांदा घालायचा.
आणि १ बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा.
कांदा आणि टोमॅटो फक्त मिक्स करून घ्यायचा.
मिक्स करून झाले की त्यात अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ घालून मॅरीनेट केलेले स्वछ धुतलेले चिकन घालायचे.
दीड पाव चिकन घेतले आहे.
खूप सोपी रेसिपी आहे. फार काही यामध्ये वाटण करावे लागत नाही. पण चवदार खूप छान होते.
स्पेसिफिकली घरी बनवलेला फ्रेश मसाला खूप छान लागतो.
आता कांदा टोमॅटो आणि चिकन छान परतून घायचे आहे झाकण ठेवायचे नाही.
चिकन शिजायला १५-२० मिनिटे लागतात.
१० मिनिट हे चिकन शिजल्यावर पांढरा असा कलर आला आहे.
म्हणजेच चिकन शिजत आले आहे.
असेच २०-२५ मिनीट परतल्यानंतर चिकन चेक करून पाहायचे आहे.
८०-९०टक्के शिजल्यावर त्यात आपण बनवलेला भाजून घेतलेला खडा मसाल्याची पूड आणि मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्याचे आहे.
एवढा छान सुगंध येतोय.
ताज्या मसाल्याची बात काही औरच आहे..
मसाल्याचे छान कोटिंग चढले आहे चिकन ला याची चवही उतरली पाहिजे म्हणून अजून १० मिनिट चिकन परतून घेऊयात.
आणि त्यात १ चमचा पाणी घालू यात म्हणजे मसाला चिक्टणार नाही तळाला.
वाऊ काय मस्त कोटींग आले आहे तुम्ही बघतच आहात रंग काय सुरेख आलाय. मसाल्याचे coating kasal jabardast alay.
Ani ताज्या मसाल्याची चव आणि वरून भरपूर कोथिंबीर भन्नाट...
आणि येस नक्की try karun bagha
Recipe banvun paहिली तर फोटो नक्की शेयर करा.
आणि सबस्क्राईब अजून केले नसेन तर जरूर करा.
वेळात वेळ काढून रेसिपी पहिली तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.
पुन्हा भेटुयात अश्याच एका मस्त चमचमीत रेसिपी बरोबर.
तोपर्यंत मस्त राहा..खुश रहा.. रेसिपी ट्राय करत रहा..आनंदी राहा...आणि मुख्य म्हणजे खात राहा.....
Comments
Post a Comment